Maggie manchurian



साहित्य: दोन पॅकेट मॅगी, कॉर्नफ्लोअर, तांदळाचे पीठ, मीठ, मॅगी मसाला, सोया सॉस, टोमॅटो केचप, शेजवान चटणी (पर्यायी), कोबी, पातीचा कांदा, तेल, कांदा, आल लसूण पेस्ट.

 कृती: प्रथम मॅगी मसाला न घालता शिजवून घ्यावी. शिजवून झाल्यानंतर एका बाउल मध्ये शिजवून घेतलेली मॅगी त्यात पातीचा कांदा, मॅगी मसाला, शेजवान चटणी, कॉर्नफ्लोअर, तांदळाचे पीठ, आल लसूण पेस्ट आणि मीठ सर्व घालून मिक्स करावे व त्याचे Manchurian balls बनवावेत . त्यानंतर हे बॉल्स क्रश केलेल्या मॅगीमध्ये घोळवावेत व तेलात तळून घ्यावेत.त्यानंतर  कढई मध्ये तेल घालून त्यात आल लसूण 
पेस्ट, चिरलेला कांदा, सोया सॉस, टोमॅटो केचप सर्व घालून त्यात कॉर्नफ्लोअर ची पेस्ट घालून सर्व मिक्स करावे व त्यात Manchurian balls घालावेत व नीट sauce मध्ये परतावेत. ग्रेव्ही पातळ हवी असेल तर थोड पाणी घालावं. दोन मिनिट गॅसवर ठेवून गरमगरम Manchurian plate मध्ये कडून वर कोबी ने सजवावे. Hot, crunchy Maggie manchurian ready...☺️




Comments

Post a Comment