Posts

दृष्टीबदल

श्रुती, एक २८ वर्षांची लग्न झालेली सुंदर तरुणी. जेव्हा तीच लग्न झालं तेव्हा ती फक्त ग्रज्युएट झालेली होती. पण नवऱ्याच्या घरात सर्व पाठिंबा देणारे मिळाले आणि तिने तीच पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केलं व चांगल्या ठिकाणी नोकरी करू लागली. नवरा खूप समजूतदार, मदत करणारा होता. श्रुतीला जे काही करायची इच्छा व्हायची त्यात तो तिला पाठिंबा द्यायचा व हवी ती मदत देखील करायचा. आणखी काय हवं असतं एखाद्या व्यक्तीला. पण श्रुती जरा वेगळीच होती. तिचा स्वभाव काहीसा वेगळा होता. वेगळा या अर्थाने की तिला कितीही यश मिळालं, कितीही आनंद देणारी गोष्ट मिळाली तरीही ती त्या क्षणी तिच्याकडे जे नाही त्याचा विचार करत राहायची आणि त्यामुळे जे तिच्याकडे आहे त्याच महत्त्व कमी करून टाकायची. परिणामी, सर्व असूनही ती बऱ्याचदा असमाधानी राहायची. या तिच्या स्वभावामुळे ती सतत एक अपूर्णतेचा भाव घेऊन वावरायची आणि चालू परिस्थितीमधील आनंद घालवायची.             श्रुतीच्या बाबतीत जे झालं ते आपल्या बऱ्याच लोकांच्या आयुष्यात होत असतं. सतत नवीन काहीतरी मिळवण्याच्या नादात आपण जे काही  चांगलं आपल्याकडे आहे त्या...

Maggie manchurian

Image
साहित्य: दोन पॅकेट मॅगी, कॉर्नफ्लोअर, तांदळाचे पीठ, मीठ, मॅगी मसाला, सोया सॉस, टोमॅटो केचप, शेजवान चटणी (पर्यायी), कोबी, पातीचा कांदा, तेल, कांदा, आल लसूण पेस्ट.  कृती: प्रथम मॅगी मसाला न घालता शिजवून घ्यावी. शिजवून झाल्यानंतर एका बाउल मध्ये शिजवून घेतलेली मॅगी त्यात पातीचा कांदा, मॅगी मसाला, शेजवान चटणी, कॉर्नफ्लोअर, तांदळाचे पीठ, आल लसूण पेस्ट आणि मीठ सर्व घालून मिक्स करावे व त्याचे Manchurian balls बनवावेत . त्यानंतर हे बॉल्स क्रश केलेल्या मॅगीमध्ये घोळवावेत व तेलात तळून घ्यावेत.त्यानंतर  कढई मध्ये तेल घालून त्यात आल लसूण  पेस्ट, चिरलेला कांदा, सोया सॉस, टोमॅटो केचप सर्व घालून त्यात कॉर्नफ्लोअर ची पेस्ट घालून सर्व मिक्स करावे व त्यात Manchurian balls घालावेत व नीट sauce मध्ये परतावेत. ग्रेव्ही पातळ हवी असेल तर थोड पाणी घालावं. दोन मिनिट गॅसवर ठेवून गरमगरम Manchurian plate मध्ये कडून वर कोबी ने सजवावे. Hot, crunchy Maggie manchurian ready...☺️

कैरीची कढी

Image
साहित्य: एक मध्यम आकाराची कैरी, एक वाटी ओलं खोबर, एक मोठी हिरवी मिरची, मीठ आणि पाणी. फोडणीसाठी: जिरे, हिंग, तेल, मोहरी व कढीपत्ता. कृती: कैरीची साल काढून त्याच्या बारीक फोडी करून घ्या. मिक्सरमधे कैरीच्या फोडी, खोवलेलं ओलं खोबरं, मिरची आणि चवीनुसार मीठ घालावं. त्यानंतर त्यात थोडे थोडे पाणी घालून मिश्रण वाटून घ्यावे. मिश्रण एकदम बारीक वाटून घ्यावे. कढी अगदी पातळ करायची नाही. Consistency medium ठेवावी. ही कढी एका पातेल्यात काढून घ्या. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग व कढीपत्ता घालावा व ही फोडणी कढीवर घालावी. आपली झटपट होणारी कैरीची कढी तयार..            ही कढी भातावर घेतली जाते. विशेषतः कर्नाटकमधील काही भागात ही बनवतात व याला माईनकाइ तम्बळी असे म्हटले जाते.