कैरीची कढी
साहित्य: एक मध्यम आकाराची कैरी, एक वाटी ओलं खोबर, एक मोठी हिरवी मिरची, मीठ आणि पाणी. फोडणीसाठी: जिरे, हिंग, तेल, मोहरी व कढीपत्ता.
कृती: कैरीची साल काढून त्याच्या बारीक फोडी करून घ्या. मिक्सरमधे कैरीच्या फोडी, खोवलेलं ओलं खोबरं, मिरची आणि चवीनुसार मीठ घालावं. त्यानंतर त्यात थोडे थोडे पाणी घालून मिश्रण वाटून घ्यावे. मिश्रण एकदम बारीक वाटून घ्यावे. कढी अगदी पातळ करायची नाही. Consistency medium ठेवावी. ही कढी एका पातेल्यात काढून घ्या. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग व कढीपत्ता घालावा व ही फोडणी कढीवर घालावी. आपली झटपट होणारी कैरीची कढी तयार..
ही कढी भातावर घेतली जाते. विशेषतः कर्नाटकमधील काही भागात ही बनवतात व याला माईनकाइ तम्बळी असे म्हटले जाते.

Wow mouth watering
ReplyDeleteThnks for reply 😊
ReplyDelete